शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! रात्रीपासून चांगलाच बरसतोय, जिल्ह्यांतही पावसाची हजेरी 

By श्रीकिशन काळे | Published: September 02, 2023 10:26 AM

मगरपट्टा येथे शहरातील सर्वाधिक ५४ मिमी पावसाची नोंद आज सकाळी ९ पर्यंत झाली आहे. 

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क,  पुणे : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्रीपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यंदाच्या हंगामातील हा जोरदार म्हणावा असा पाऊस होत आहे. हा केवळ पुण्यातच नव्हे तर कोकण व जिल्ह्यात देखील होत आहे. मगरपट्टा येथे शहरातील सर्वाधिक ५४ मिमी पावसाची नोंद आज सकाळपर्यंत झाली आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने २ सप्टेंबरनंतर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यांचा अंदाज खरा ठरला असून शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे, ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत पुण्यात १९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मगरपट्टा येथे ५४ मिमी पाऊस झाल्याची आकडेवारी हवामानशास्त्र विभागाने नोंदवली आहे. बारामती परिसरात देखील चांगला पाऊस होत आहे. यंदा आतापर्यंत बारामतीला चांगला पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. तसेच चिंचवडला सर्वाधिक ८३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे शहरातील आकाश ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

शुक्रवारी रात्रीपासून सकाळी ९ पर्यंतचा पाऊस 

शिवाजीनगर: १९.६ पाषाण : १२.२ लोहगाव : ३१.८ चिंचवड : ८३.५ मगरपट्टा : ५४.०बारामती : ३५.२

टॅग्स :monsoonमोसमी पाऊस