शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

Pune Rain: शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 3:13 PM

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे

शिक्रापूर : पाबळ ता. शिरूर सह वेळनदी भागातील खेडआंबेगाव मधील गावांमध्ये गेली आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला असून रविवारी दुपारी एक वाजता सांडव्यातून वेळ नदीत पुढे  पाणी सुरू झाले. बंधारा भरल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी काहीसा कमी प्रमाणात पाणीसाठा असलेला हा बंधारा उन्हाळ्यात कोरडा पडला होता. भीषण दुष्काळी परिस्थिती असलेल्या पाबळ, केंदूर, धामारी भागात गेले दोन महिने पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्याचबरोबर चाऱ्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. गेले ८ दिवस  पावसाने हजेरी लावल्याने या भागाला मोठा दिलासा मिळालाय. खैरेनगर, धामारी, पाबळ या भागात पिण्याच्या पाण्यासाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून अनेक योजना करण्यात आल्या आहेत. बंधारा कोरडा पडल्यानंतर सर्व योजना बंद पडल्या होत्या. त्याचबरोबर या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी आल्याने याभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून येत्या काळात या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका १२ गावांना बसतो. थिटेवाडी बंधाऱ्यात डिंभा किंवा चासकमानचे पाणी सोडण्यासाठी गेली अनेक वर्ष आंदोलने केली जात आहेत. परंतु पावसाळ्या नंतर ही आंदोलनाची धार कमी होते व पुन्हा बंधारा कोरडा पडला की आंदोलने सुरू होतात. सध्या बंधारा भरल्याने या भागात आनंदाचे वातावरण असून या भागातील पाणी प्रश्न काहीसा मार्गी लागणार आहॆ.               

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरKhedखेडambegaonआंबेगावRainपाऊसDamधरण