पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांची गुरुवारची दुपार सुखद गेली. दुपारी 3 च्या सुमारास पुण्यात विजांच्या कडकडात दमदार पावसाला सुरुवात झाली. जूनचा महिना संपत अाला तरी पुण्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. दिवसभर कडक ऊन अाणि रात्रीच्या उकाड्याने पुणेकरांना हैरान केले हाेते. त्यातच पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती खालावली अाहे. शहराताल दाेन महिने पुरेल इतकाच पाणीसाठी या धरणांमध्ये अाहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट अाेढविण्याचे चित्र अाहे. परंतु अाज अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांमध्ये एक सकारात्मक उर्जा पाहायला मिळत अाहे.
पुण्यात पावसाला दमदार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:18 PM