पुणे : शनिवार, रविवार आणि सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर आज रात्रीही पुण्यात पाऊस जोरदार बॅटिंग करणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ अरूपम कश्यपी यांनी दिली. पाऊस केवळ याच नाही पुढील आठवड्यातही महाराष्ट्रात बरसणार असल्याने दिवाळीतही जलधारा कोसळणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मागील तीन दिवसात पुणे शहरावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून नागरिक आता वैतागले आहेत. पावसामुळे एकीकडॆ शहरातील विविध भागांमध्ये पाणी साठून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असताना सांडपाणी आणि वाहतूक व्यवस्थापनातही अडथळे येत आहेत. त्यातच पुढील काही दिवस पावसाचे असल्याच्या अंदाजाने पुणेकर धास्तावले आहेत.
फक्त पुण्यात नाही तर राज्यातील इतरही भागात पाऊस होणार आहे. बघा राज्यातल्या पावसाचा सविस्तर अंदाज.
- कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ भागासाठी पुढील काही दिवस पावसाचे
- बंगालच्या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला.
- कोकण आणि गोव्यात काही भागात जास्त किंवा मुसळधार पावसाची शक्यता.
- २२ ते २६ तारखेच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति पावसाची शक्यता
- मध्य महाराष्ट्रात २३ तारखेला पाऊस. तर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचे.
- मराठवाड्यात बीड, उस्मानाबादमध्येही पावसाचा अंदाज
- कोकण,गोवा,मराठवाड्यात विजांच्या कडकडटासह पावसाची शक्यता
- पुणे शहरात मागील दोन दिवस संध्याकाळी पाऊस होतोय. आज किंवा उद्याही पाऊस होऊ शकतो. आज रात्रीही पुण्यात पावसाची शक्यता.
- दिवाळीत पाऊस कायम राहणार आहे. २४ तारखेपर्यंत पाऊस असणार असून २५,, २६, २७ तारखेला तुलनेने कमी पावसाची शक्यता