पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला़ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील कर्जत, संगमेश्वर, देवरुख ७०, खेड, मंडणगड ६०, चिपळूण, महाड ५०, जव्हार, माथेरान, राजापूर ४० मिमी पावसाची नोंद झाली़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ९०, राधानगरी, शाहूवाडी ७०, गगनबावडा, इगतपुरी, लोणावळा (कृषी) ६०, चंदगड ५०, पौड, मुळशी, पेठ, शिराळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ३० मिमी पाऊस झाला़ तसेच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडला़मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसापासून वंचित आहे़ हिमायतनगरमध्ये १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ विदर्भातील साकोली ४०, कोरची, कुही, सडक अर्जुनी ३०, आर्णी, भंडारा, कळंब, कारंजा लाड, रामटेक, सालेकसा, वाशिम २० मिमी पाऊस झाला़घाटमाथ्यावरील कोयना ११०, ताम्हिणी, दावडी, शिरगाव ९०, अम्बोणे ८०, डुंगरवाडी ७०, कोयना (नवजा), लोणावळा (टाटा) ६०, खंद, भिवपुरी ५०, वळवण, ठाकूरवाडी, शिराटा, खोपोली ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ रविवारी दिवसभरात पुणे ६, महाबळेश्वर २९, रत्नागिरी ७, नागपूर ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ २० आॅगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २१ आॅगस्ट रोजी दक्षिण कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़आता ओडिशात अतिवृष्टी?सध्या मॉन्सून केरळ, पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, मध्य महाराष्टÑ, तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग व किनारपट्टी परिसरात सक्रीय आहे़ येत्या २४ तासात ओडिशा येथे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून झारखंड, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़
विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:37 AM