शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Video: खेड-शिवापूर परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 11:00 PM

दोन तासांच्या तुफान पावसामुळे ओढेनाल्यांना पूर 

खेड-शिवापूर : बुधवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरात तर २०१३च्या आठवणी जागवल्या.  पुणे-सातारा महामार्गावर दुपारी ४ च्या सुमारास वेळूफाटा व खेड-शिवापूर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुमारे २ तास पावसाने हजेरी लावल्याने ओढेनाल्यांना पूर आला. महामार्गाच्या सेवा रस्त्याची अपूर्ण कामे तसेच परिसरातील डोंगरटेकड्यांच्या लचकेतोडीमुळे पावसाच्या पाण्याचे बंद झालेले नैसर्गिक प्रवाहांमुळे ही परिस्थिती ओढावली. पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

आजचा पाऊस पाहून ६ जून २०१३ रोजी झालेल्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. या वेळी आलेल्या पुरात विशाखा व संस्कृती वाडेकर या मायलेकींचा प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी अंत झाला होता. पुन्हा रखडलेल्या कामाचा आजही फटका बसल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी संताप व्यक्त केला.भोरसह पुरंदर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. नेहमी पावसाची ओढ असलेल्या पुरंदरमध्ये या वर्षी सुरुवातीलाच चांगला वर्षाव झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे दौंड, इंदापूर या तालुक्यांतही चांगला पाऊस पडला आहे. 

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे