पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे शहरात काल रात्री सुरू झालेला पाऊस अधूनमधून सातत्याने होत असून सकाळी अनेकदा जोरदार पावसाच्या सरी आल्या होत्या.पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सातारा ८९, कोल्हापूर ४६.४, पुणे ३८, अहमदनगर २३.२, सांगली १९, सोलापूर १५, महाबळेश्ववर ३२नाशिक ११.७, हर्णे ५९, मुंबई १५.६, सांताक्रुझ १८, रत्नागिरी ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद २७, बीड ५२, परभणी ९८ मिमी, विदर्भातील बुलढाणा १९, चंद्रपूर २४.३, अकोला ९, गडचिरोली ११.२, नागपूर ८.६, वाशिम ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जाण्याची कर्मचाऱ्यांची तयारी सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य व ईव्हीएम वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. तेथे सकाळपासून हे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. उद्याही मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आशर मेजरमेंट यांनी दिलेल्या माहिती नुसार कात्रज ४७, कोथरुड ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुण्यात पावसाची संततधार; पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 11:36 AM