पुणे शहरात मंगळवारी रात्री उशिरा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कर्वेनगर, वाघोली, चंदननगर, येरवडा, वानवडी, पद्मावती परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात शहरातील काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला.
हवामान विभागाने पुणे शहरात आणखी चार दिवस वृष्टी सांगितली आहे. मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज, खडकवासला, वारजे, कोथरुड मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील हवेतील आर्द्रता कमी होत असून २३ ऑक्टोबरपासून विदर्भातून मॉन्सूनच्या माघारी सुरुवात होण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मॉन्सूनने माघारी गेला असण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, उष्ण हवेमुळे स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.