पुण्यात धुव्वाधार पाऊस, नागरिकांची तारांबळ; पालकमंत्री अजित पवार एक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:56 PM2024-06-08T20:56:07+5:302024-06-08T20:56:30+5:30

पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

Heavy rains in Pune, Guardian Minister Ajit Pawar on action mode | पुण्यात धुव्वाधार पाऊस, नागरिकांची तारांबळ; पालकमंत्री अजित पवार एक्शन मोडवर

पुण्यात धुव्वाधार पाऊस, नागरिकांची तारांबळ; पालकमंत्री अजित पवार एक्शन मोडवर

पुणे - पुणे शहर आणि परिसरात शनिवारी संध्याकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ झाल्याचं दिसून आले. 

याबाबत पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

दरम्यान, या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

पुण्यात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यात पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून, आकाश भरून आले आहे.

 

Web Title: Heavy rains in Pune, Guardian Minister Ajit Pawar on action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.