शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 3:33 PM

१६ गाडया रद्द, १७ गाड्याच्या स्थानकात बदल तर १० गाड्याच्या वेळा बदलल्या

ठळक मुद्देपुण्यातील इंद्रायणी, डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा समावेश

पुणे : रविवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली आहे. पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.यात इंद्रायणी,डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा समावेश आहे. मध्य रेल्वेने जवळपास १६ गाडया रद्द केल्या आहेत. तर १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरीय स्थानकावरील रुळांवर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने गाड्यांना रद्द तर काही गाड्याच्या वेळा बदलण्यात आले आहे.  या गाडया रद्द 

पुणे - मुंबई : डेक्कन क्वीन एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस तसेच मुंबई - जालना , मुंबई - मनमाड ,मुंबई - मडगाव एक्सप्रेस,मुंबई - कोल्हापूर या गाड्याच्या अप - डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

ह्या गाडया पुण्यापर्यंत धावल्या 

सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, कोल्हापूर - मुंबई एक्सप्रेस, हुबळी - मुंबई एक्सप्रेस, पंढरपूर - दादर एक्सप्रेस, बिदर - मुंबई एक्सप्रेस या गाड्यांच्या मुंबई पर्यत न जाता पुणे स्थानकापर्यंतच धावल्या. त्याचा परतीचा प्रवास पुणे स्थानकावरून सुरू झाला. अशा एकूण १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेMumbaiमुंबईRainपाऊस