शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

वारजे येथे महामार्गावर ट्रक पलटल्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 1:48 PM

सुरतहून पार्सल घेऊन निघालेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पूलाच्या उतारावर हा अपघात घडला.

ठळक मुद्देभरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड असल्याने पार्सल बाहेर काढावे लागले अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत नाही

वारजे : मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील अतुलनगर समोर ट्रक पलटी झाल्याने महामर्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. २८ ) पहाटे तीन वाजता अपघात होऊनही पलटी झालेला ट्रक काढायला सकाळी साडे नऊ वाजल्याने या ठिकाणी     याबाबत सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, सूरतहून पार्सल घेऊन हा ट्रक (केए.२२ ए. ८६९७) बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास डुक्कर खिंडीच्या पुढे रुणवाल पूलाच्या उतारावर  चालकाचे नियंत्रण सुटले. याठिकाणी माई मंगेशकरजवळ नवीन पुलाचे काम सुरु असल्याने अंधारात कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी त्याच्यावरूनच घसरुन पलटी झाल्याचा अंदाज वाहतूक कर्मचारी व पोलिसांनी व्यक्त केला. सुदैवाने यात चालकास कोणतीच इजा झाली नाही.     यानंतर वाहतूक विभागाकडून काहीप्रमाणात वाहतुक वळवण्याचा प्रयत्न केला. पण सकाळी सातनंतर मात्र या ठिकाणी चांदणी चौक व वडगाव दोन्ही बाजूला कोंडी वाढत गेली. भरलेला अवजड ट्रक क्रेनने उचलणे अवघड जात असल्याने यातील पार्सल बाहेर काढून ट्रक मोकळा करण्यात आला. व सकाळी साडे नऊच्या सुमारास ट्रक बाजूला काढण्यात आला. संपूर्ण वारजे परिसर, महामार्ग व सेवा रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. अकरा वाजले तरी परिसरातील वाहतुक सुरळीत झाली नव्हती. ................................ सदर पलटी झालेला ट्रक काढल्यावरही त्याचे डिझेल व आॅइल महामार्गावर सांडले होते. वाहतुक कोंडीमुळे अग्निशमन विभागाची गाडी अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. रस्त्यावरील आॅइल धुवून काढल्यानंतर ही मार्गिका (लेन) सुरु करण्यात आली. अजय चांदखेडे - पोलीस निरीक्षक, वाहतुक वारजे विभाग 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस