चिंचवड : पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील तिसऱ्या क्रमांकाच्या लेनमधून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असताना, नियम धाब्यावर बसवून तिन्ही ‘लेन’वरून ही वाहने धावतात. त्यामुळे इतर वाहतुकीचा खोळंबा होत असून, अवजड वाहनांसाठी लेन क्रमांक ३ मधून वाहतुकीची सक्ती करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे, महामार्गावर सततच्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहने लेन क्रमांक ३ वरून जाणे गरजेचे आहे. (वार्ताहर)जड वाहने बेशिस्तपणे महामार्गावरून जातात. प्रामुख्याने लोणावळा घाट परिसरात ही वाहने चुकीच्या पद्धतीने तिन्ही लेनवरून मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी अवजड वाहने नादुरुस्त होतात. ही वाहने बंद पडलेल्या अवस्थेत लेन क्रमांक १ व २ वर उभी असतात.
‘एक्सप्रेस-वे’वर जड वाहनांना हवी एकाच ‘लेन’ची सक्ती
By admin | Published: March 27, 2016 2:48 AM