पुणे : सणवाराला शहरात चारचाकी आणि जड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. रस्ते लहान असल्याने त्यात एखादी चारचाकी आली की, सर्वत्र वाहनांच्या रांगा लागतात. यावर उपाय म्हणून किमान सणवाराच्या दिवशी जडवाहनांना मध्यवर्ती भागात बंदी करावी, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे यावर उपाय करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन जडवाहनांना शहरात बंदीचा विचार आहे. त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल. त
सेच पीएमपीच्या लांब बस शहरातील लहान रस्त्यांवर कोंडीत भर घालतात. त्यासाठी लहान बसला परवानगी असावी आणि मोठ्या बसला प्रवेश देऊ नये, याप्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील, असेही आयुक्तांनी सांगितले.