शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय... सरपंचांशी साधला संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:41 PM

आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद..

ठळक मुद्देपाणी, चाराटंचाईबाबत केली चर्चाचारा डेपोच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन 

बारामती : हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय, तुमच्या गावात पाण्याची काय परिस्थिती आहे?’  दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातीळ दुष्काळाची परिस्थिती पाहता सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर साबळेवाडी, काऱ्हाटी , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणारे प्रश्न मांडले. या वेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे; मात्र वन विभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत,’ अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉन्फरन्स कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याप्रश्नी लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सूचना केली. तसेच, साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे  केली. तर, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी १५ दिवसांत संपेल; त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे,’ अशी मागणी केली. तसेच, खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काºहाटीचे सरपंच बबन जाधव यांनी ‘चारा छावणीऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा,’ अशी मागणी केली. .......* दोन दिवसांत मंत्रालयामध्ये बैठक होईल, त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच, काऱ्हाटी सरपंच जाधव यांनी ‘१ जूनपर्यंत शेतकºयांना पीककर्ज मिळावे, अशी मागणी केली. दरम्यान, या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. ..........

आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या ७ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पुणे जिल्ह्यात आज अखेर ५१२ विधंण विहिरीद्वारे, ५२ नळ-पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून, १० तात्पुरत्या नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून व ५७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

................

पिण्याच्या पाण्याच्या नळ-पाणीपुरवठा योजनांची ७.७५ कोटी इतकी विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे.  सर्व नळ-पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात एकूण ३ शासकीय चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत. सेवाभावी संस्थांच्या २ छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये १३५ जनावरे दाखल आहेत. 

............

जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ७ तालुक्यांतील ८३७ गावांतील १ लाख ७२ हजार ५५३ शेतकºयांना ६६ कोटी ४३ लाख इतकी रक्कम वाटप केलेली आहे. 

.............

जिल्ह्यातील एकूण १९  हजार 39 शेतकºयांनी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी ६ कोटी ४६ लाख अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ६  कोटी ४४ लाख इतकी रक्कम ८ हजार ४१५ शेतकºयांना अदा 

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत २.५५ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३८ हजार शेतकºयांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण  ७ कोटी ५० लाख इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याचे काम सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ७२८ कामे सुरू असून त्यावर २ हजार ६३७ मजूर उपस्थित आहेत. सर्वात जास्त ५१० मजूर इंदापूर तालुक्यात असून सर्वात कमी ३४ मजूर जुन्नर तालुक्यात आहेत. जिल्ह्यामध्ये ७ हजार ९५३ कामे शेल्फवर आहेत.......

दुष्काळ निवारणासाठी सरपंच आणि जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचा संवाद घडवून आणणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल बारामती तालुक्यातील सरपंच नीलेश केदारी यांनी बारामती सरपंच संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दुष्काळाच्या प्रश्नावर थेट सरपंचांशी मोबाईलवर चर्चा करून समस्या जाणून घेतल्याबद्दल आजच्या संवादादरम्यान अनेक सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. .........

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळsarpanchसरपंच