बारामती : बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि २४ )पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्यानंतर सोमवार (दि. २८)पासून हेल्मेट सक्ती सुरू झाली. मात्र, बारामती वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे हेच बारामती शहरात विनाहेल्मेट दुचाकीवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.वाहतूक शाखेचा प्रमुखांनी हेल्मेट सक्ती झुगारल्याचे निदर्शनास आले. बारामती शहरातील हेल्मेट सक्तीच्या बाबतील खुद्द वाहतूक शाखाच किती गंभीर आहे, हे यामुळे अधोरेखित झाले. तर, ही सक्ती हस्यास्पद ठरल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. बारामती विभागाअंतर्गत येणाऱ्या बारामती, दौंड, इंदापूर शहर तालुक्यात करण्यात येणार होती. त्याप्रमाणे सोमवार (दि. २८) पासून बारामती उपविभागात हेल्मेट सक्ती कासव गतीने लागू झाली. बारामती शहरातील वाहतूक विभागाती भिस्त प्रमुख म्हणून दबडे यांच्यावर आहे. शहरात हेल्मेट सक्ती झाल्यानंतरही वाहतूक विभागाचे प्रमुखच नियमाचे उल्लंघन करताना अढळून आले आहेत.विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास करताना दबडे यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे वाहतूक विभाग, पोलिस प्रशासनच या सक्तीबाबत किती गंभार आहे, हे स्पष्ट झाले. तर ज्यांनी कारवाई करायची तेच नियमांचे उल्लघंन करणार असतील तर हेल्मेट सक्ती निरर्थक असल्याचीही चर्चा बारामतीमध्ये रंगली होती. याबाबत उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.अवघ्या दोन वाहन निरिक्षकाच्या बळावर तीन तालुक्यांमध्ये हेल्मेट सक्ती आणि चारचाकीला ‘सेफ्टी बेल्ट’ न वापरणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे वाहनांची संख्या फ्लार्इंग स्कॉड मधील कर्मचाºयांची संख्या पाहता हेल्मेट सक्ती कसतरीचे ठरत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती उपविभागात सोमवारपासून १५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनचालकांकडून ४.५ लाख दंड वसुल होणार आहे, असे सांगोलकर यांनी सांगितले.
बारामती शहरात हेल्मेट सक्ती हास्यास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 2:10 AM