पुणे : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने विविध ठिकाणी मदत कार्य सुरु आहे. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून शेकडो कार्यकर्ते अहोरात्र मदतकार्य करीत असल्याचे समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक यांनी सांगितले. जनकल्याण समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मदतकार्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी शर्थीचे प्रयल चालू आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा आणि पलूस तालुक्यातील सुमारे ५०,००० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये हलविण्यात आले असून सुरुवातीला २३५ नागरिकांची सुखरूप सुटका केल्यानंतर आता ३ हजार ५०० नागरिकांची दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तीन ठिकाणी सुरू केलेल्या केंद्रांतून सुमारे ३०० स्त्री-पुरूष कार्यकर्ते सक्रिय आहेत. हेलिकॉप्टरने सुटका केलेल्या नागरिकांकरिता दर तासाला १ हजार भोजन पाकिटे एनडीआरएफ व जवानांकडे दिली जात आहेत. यासोबतच सातारा जिल्ह्यात सातारा, कराड आणि पाटण येथील १ हजारापेक्षा अधिक नागरिक आपत्तीत सापडले आहेत. समितीने २०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली. पाटण परिसरात ७० आपदग्रस्तांना रग व चादरींचा पुरवठा केला आहे. २२ केंद्रांत एकूण २५० स्त्री-पुरुष, कोल्हापूर जिल्हयात शिरोळ तालुक्यातील 38 हजार व्यक्तींची तात्पुरत्या निवासस्थानात व्यवस्था केली असून २२ केद्रांमध्ये एकूण २५० स्त्री-पुरुष कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त आहेत. दहा आरोग्य तपासणी केंद्रात प्रथमोपचार सुरु असून ६ हजार लिटर पिण्याच्या पाण्यासह कपडे व औषधांचे वितरण सुरु आहे. कोल्हापूर शहर व इचलकरंजी, वारणा कोडोली येथे पुरात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढून झाल्यावर कोल्हापूरमधील ६ व इचलकरंजी येथील ४ पूरग्रस्त केंद्रांचे संपूर्ण पालकत्व घेण्यात आले आहे. ही सर्व व्यवस्था सर्व व्यवस्था रा.स्व. संघ, जनकल्याण समिती व राष्ट्र सेविका समिती यांच्यातर्फे जरण्यात आली आहे. यासोबतच शहरातील २३ केंद्रांवर ३२ डॉक्टर्स व त्यांच्या सहायकांची पथके कार्यरत आहेत. ======पुणे आणि राज्यभरातून आतापर्यंत २६०० कार्यकर्त्यांनी नाव नोंदणी केली असून सोमवार पासून ३०० च्या गटाने कार्यकर्ते सांगली, कोल्हापूरला जाऊन तीन दिवस गावांमध्ये राहून स्वच्छता करणार आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणांवर भर देण्यात येणार आहे. जवळपास २८० गावांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. या कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता साहित्यासह आवश्यक औषधे, निजंर्तुके देण्यात येणार असल्याचे शैलेंद्र बोरकर यांनी सांगितले.
राज्यभरातून संघाच्या जनकल्याण समितीकडे पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 2:43 PM
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी शर्थीचे प्रयल चालू आहेत.
ठळक मुद्दे शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र करताहेत काम कोल्हापूर जिल्हयात शिरोळ तालुक्यातील 38 हजार व्यक्तींची तात्पुरत्या निवासस्थानात व्यवस्था२२ केद्रांमध्ये एकूण २५० स्त्री-पुरुष कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त