पुणे : जोरदार वृष्टी व भूस्खलनामुळे केरळला पुराने वेढले आहे. पुराच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी बीव्हीजी समुहाने पुढाकार घेतला असून आत्तापर्यंत केरळमधील साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे.बीव्हीजीचे दक्षिण विभागाचे प्रमुख विजय पॅट्रीक व वरिष्ठ व्यवस्थापक राजा आरमुगम यांच्या नेतृत्वाखाली मदत कार्य करण्यासाठी बीव्हीजीची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमच्या माध्यमातून बीव्हीजी समुहाचे ५०० कर्मचारी केरळमधील नागरिकांना जेवन, नाश्ता व कपडे देण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत करण्यात आली आहे.कन्नर जिल्ह्यात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले असून या ठिकाणी बीव्हीजीचे ३२७ कर्मचारी नागरिकांना मदत देण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्रिवेंद्रम व कसारगोड जिल्ह्यात पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.नियंत्रणात आलेल्या परिसरातील नागरिकांना सुके कपडे देण्याचे काम बीव्हीजीच्या वतीने केले जात आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. समुहाच्या वतीने गरजू लोकांना मोफत फोन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बीव्हीजी समुहाकडून केरळमध्ये मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:07 AM