केरळमधील पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:33 AM2018-08-29T02:33:03+5:302018-08-29T02:33:28+5:30
चंदननगर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या केरळवासीयांसाठी नगररोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी, कल्याणीनगरमधील सर्व मनपा व खासगी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी ५० पोती धान्य, २ पोती डाळी, बिस्किटे, साबण, तेल डबे, कपडे व ब्लँकेट इ. साहित्य जमा केले.
केरळची पूरस्थिती पाहून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन नियोजन केले व मदतीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्याला छोट्या मुलांनी भरघोस प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात साहित्य जमा करून दिले. जमा केलेले साहित्य ट्रक द्वारा पोहोचविण्याचे नियोजन विद्यांकुर शाळेच्या प्रिन्सिपल मिनल कसबे यांनी केले. सदर मदतीसाठी नगररोड विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, मनपा शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच, नगरवाला स्कूल, विद्यांकुर स्कूल, चाटे स्कूल, सनराईज स्कूल, तु. धो. पठारे विद्यालय पी. टी. पठारे ज्यु. कॉलेज व ई-लर्निंग स्कूल येरवडा या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात मदत दिली.