बिबवेवाडी : मराठवाडा सध्या भीषण दुष्काळाशी सामना करत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे यंदाही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केले होते. यासाठी कात्रजमधील प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी ३ लाखांची मदत केली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी ही मदत त्यांना उपयोगास येणार आहे. या वर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात ५३ जोडप्यांना गृहोपयोगी भांडी-वस्तू, मणिमंगळसूत्र, वधू-वर पोशाख व विवाहाचा सर्व खर्च नाथ प्रतिष्ठानच्या वतीने उचलण्यात आला होता. सोहळ्याच्या खर्चासाठी १ लाख ४१ हजार रुपयांचा धनादेश प्रगती फाउंडेशनच्या वतीने कदम यांनी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त १६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजारांची मदत करण्यात आली.(वार्ताहर)
प्रगती फाउंडेशनची दुष्काळग्रस्तांना मदत
By admin | Published: April 26, 2016 1:15 AM