दिवे (ता. पुरंदर) येथील कातोबानाथ मंदिरात भारत फोर्स या कंपनीच्या माध्यमातून आरोग्य विभागास भौतिक सुविधा पुरविणे व रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी भारत फोर्स सीएसआर विभागाच्या प्रमुख लीना देशपांडे, संभाजीराव झेंडे, विजय कोलते, अशोक टेकवडे, दिगंबर दुर्गाडे, सुुदामराव इंगळे, सभापती नलिनी लोळे, जि. प. सदस्या ज्योती झेंडे, गणेश जगताप माणिक झेंडे पाटील, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, गौरी कुंजीर, पुष्कराज जाधव, माऊली यादव ,दिवे गावचे सरपंच अमित झेंडे उपस्थित होते.
आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका, तसेच परिंचे माळशिरस आरोग्य विभागा अंतर्गत येणाऱ्या १२ आरोग्य केंद्रांना संगणक, प्रिंटर्स साहित्य तसेच माळशिरस, आंबळे, वाघापूर, सिंगापूर कोडीत आरोग्य केंद्रांच्या सुविधांसाठी व बांधकाम खर्चासाठी आर्थिक मदत भारत फोर्स कंपनीच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसेवक सागरतात्या काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर यांनी केले. आभार अमोल कामठे यांनी मानले.
--
फोटो ओळी : दिवे (ता. पुरंदर) येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, लीना देशपांडे, सागर काळे.