शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

साधेपणाने लग्न करून शेतकऱ्यांना मदत

By admin | Published: December 22, 2016 2:50 AM

मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही.

पुणे : मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही. मात्र, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.झगडे यांनी आपली कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल भालिंगे यांच्या विवाहाच्या खर्चांत बचत करून हा निधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. राज्यात विविध ठिकाणी झगडे यांनी कामाचा नेहमीच वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांनी अधिकाऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. (प्रतिनिधी)महेश झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांचा शुभविवाह २० डिसेंबर रोजी केवळ दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत साधेपणाने झाला. लग्नात कोणत्याही स्वरूपाचा डामडौल न करता हा विवाह पार पडला. यामुळे विवाहासाठी होणाऱ्या खर्चात बचत झाली. बचत झालेली ही रक्कम दोन्ही कुटुंबीयांनी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, झगडे यांच्यासह नवदाम्पत्याने या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सपूर्त केला.