पुणे : कोरेगाव भीमा येथील दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या वारसांना पाच लाख रुपये तसेच दोन व्यक्तींनी घराच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये आणि एका जखमी व्यक्तीस पाच हजार रुपये मदतनिधी दिला जाणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे निधीच्या वाटपाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली जात आहे.कोरेगाव भीमा परिसराती दूर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जाळपोळीत नुकसान व जखमी झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजूरी मिळाली असून संबंधित व्यक्तींच्या नावांचे धनादेश तयार करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत राहूल बाबाजी फटांगडे यांचा मृत्यू झाला होता. तसेच राहुल परशूराम बोंगाडे जममी झाले होते. त्याचप्रमाणे २ घरांचे नुकसान झाले.शासनाकडून मृत फटांगडे यांची आई जनाबाई फटांगडे यांना पाच लाख रुपये, जखमी राहुल बोंगाडे यांना पाच हजार रुपये, आठवले एंटरप्रायजेस आणि संजय मुथा यांना घर दुरुस्तीसाठी प्रत्येकी ३५ हजारांची मदत देण्यात येणार आहे. शासनाकडून ५ लाख ७५ हजार रुपये मदतनिधी प्राप्त झाला असून तलाठ्यांच्या मार्फत शक्रवारपासून मदतीचे धनादेश संबंधित व्यक्तींना दिले जातील.रणजित भोसलेतहसीलदार, शिरूर
कोरेगाव भीमा दंगलीतील मृतांच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:43 AM