गराडे : कोडीत खुर्द (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या हेमलता शांताराम जाधव यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी छाया दत्तात्रय खैरे यांची ४ विरुद्ध २ निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अल्का किणीकर यांनी केली.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका एस. पी. पोतदार यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कस्तुरा खैरे, विशाल कांबळे, योगेश तळेकर, बेबी खैरे उपस्थित होते.
सरपंच व उपसरपंच निवडीनंतर आमदार संजय जगताप व पुरंदर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता कोलते यांनी कोडीत खुर्द गावी जाऊन त्यांचा सत्कार केला.
निवडप्रसंगी काँग्रेसचे नेते शेखर बडदे, निरा बाजार समिती उपसभापती बापूसाहेब अवचरे, माजी सरपंच सूरज अवचरे, दिलीप खैरे, अशोक खैरे, प्रदिप खैरे, दत्ताञय खैरे, हेमंत खैरे, प्रताप खैरे, नितीन खैरे, अक्षय रणदिवे, हनुमंत अवचरे आदीसह कोडीतकर ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी : कोडीत (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हेमलता जाधव व उपसरपंचपदी छाया खैरे यांची निवड झाल्यानंतर सत्कारप्रसंगी आमदार संजय जगताप व सुनीता कोलते.