लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मोहननगर, चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास दिला. त्यामुळे पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७, रा. शितळानगर, मामुर्डी) हिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या पूर्वाला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधित कर्मचाऱ्यावर दाखल केला आहे. भूषण महाजन (वय ३५, रा. मोहननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पूर्वा वाघमारे बारावी शास्त्र शाखेत शिकत होती. कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची पर्स हरवली होती. ती पूर्वाला सापडली. पूर्वाने तरी हातात घेऊन पुन्हा तेथेच टाकून दिली. परंतु त्या पर्समध्ये असलेली रक्कम चोरीस गेल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे होते. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी पूर्वाच्या पालकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. एका विद्यार्थिनीची पर्स पूर्वाला सापडली होती, त्या पर्समधील गहाळ झालेली रक्कम जमा करावी, असा आग्रह पूर्वाच्या पालकांकडे धरण्यात आला. पूर्वाने ‘पर्स मला सापडली, परंतु हातात घेऊन पुन्हा तेथेच ठेवली’ असे सांगितले. तसेच ही बाब महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे, असे नमूद केले. पर्समधील रक्कम मी काढून घेतल्याचे दिसून येत नसेल, तर माझ्या पालकांकडून ती वसूल करू नये, असे पूर्वाचे म्हणणे होते. मात्र, या रकमेच्या भरण्यासाठी वारंवार पूर्वाला सूचना दिल्या जात होत्या.
तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी
By admin | Published: June 26, 2017 3:53 AM