शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

असा ओळखा कोकणचा राजा ! समजून घ्या रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस मधला फरक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 8:25 PM

आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. पण त्यातही हापूस आंबा असेल तर मात्र सोने पे सुहागाच ! मात्र हल्ली अनेकदा कर्नाटक हापूस दाखवून ग्राहकांना रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स

पुणे : उन्हाळा आला की आठवत ते रणरणतं ऊन, शाळेच्या सुट्ट्या आणि आंबे. महाराष्ट्रातल्या कोणाचंच बालपण याशिवाय गेलेलं नाही. पण जसजसा काळ बदलला तसतशी सुट्ट्यांची समीकरणही बदलली. आणि त्यासोबत बदललेली अजून एक गोष्ट म्हणजे आंबा. 

   आंब्याची क्रेझ जरी कायम असली तरी कोकणातल्या हापूसचे घटते उत्पादन आणि कर्नाटकने हापूस उत्पादनात मारलेली बाजी यामुळे अनेकदा हापूस घेताना फसवणूक होते.याबाबत पुण्यातले व्यापारी रोहन उरसळ यांनी बोलताना सध्या महाराष्ट्रातील हवामानाच्या बदलामुळे आंब्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबरकर्नाटक भागातही महाराष्ट्रातल्या हापूसची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अनेकदा या दोन हापूसमधील फरक ओळखू येत नाही असेही ते म्हणाले. ग्राहकांनी नक्की कोकणातला लाडका रत्नागिरी हापूस कसा ओळखायचा याच्या त्यांनी दिलेल्या खास टिप्स. 

१) रत्नागिरीचा हापूस आंबा कापल्यावर केशरी दिसतो. कोणतीही पिवळेपणाची झाक त्यावर नसते. 

२) कर्नाटक हापूस किंवा इतर आंब्यात केशरीपणा असला तरी त्याचा सुगंध हा रत्नागिरी हापूस इतका गोड येत नाही, शिवाय त्यात अनेकदा पिवळटपणाची झाक दिसते. 

३)रत्नागिरी हापूस आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात. 

४)कर्नाटक हापूस आंबा तयार झाल्यावरही कडकच असतो तर तो अधिक पिकायला लागला तर मात्र देठापासून काळा पडतो. 

५)सर्वातमहत्वाचा फरक म्हणजे कर्नाटक हापूसची साल ही जाड असते. 

६)रत्नागिरी हापूस आंब्याची साल पातळ असते. देवगडची तर इतकी पातळ असते की ते आंबे मार्च आणि एप्रिलपर्यंतची उष्णता सहन करू शकतात. नंतर ते अनेकदा खराब होत असल्याने बऱ्याचवेळा मे महिन्यात देवगड हापूस उपलब्ध नसतात. 

७)रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी अठरा ते वीस इंच इतकी असते. 

८)कर्नाटक हापूसची पेटी मात्र त्यापेक्षा लहान असून ती चौदा ते पंधरा इंचाची होती. 

९)कर्नाटक हापूसला तितकासा सुगंध येत नसून रत्नागिरी हापूसचा मात्र गोडसर घमघमाट सुटतो. 

 १०)रत्नागिरी हापूस पिवळा आणि काहीवेळा हिरवट असतो. मात्र अनेकदा लाल मातीतील लागवडीमुळे कर्नाटक हापूसवर लालसर ठिपके येतात. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेAlphonso Mangoहापूस आंबाfoodअन्न