हर्षल घोगरे हे बावडा गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. हर्षलचे वडील भगवान घोगरे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील सर्वोच्च परीक्षेत यश मिळवून हर्षल घोगरे यांनी बावडा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार प्रसंगी काढले. सत्कारप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, किरण पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, सुभाष घोगरे, संचालक डी. एन. मरकड उपस्थित होते.
यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या हर्षल घोगरे यांचा सत्कार करताना हर्षवर्धन पाटील.
२५०९२०२१-बारामती-०६