सांगवी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. एका ठिकाणी बसून व्यवसाय व नोकरी करणे शक्य नाही, या लोकांना उन्हाच्या झळा सोसत बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशाच आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला. त्या भन्नाट अवलियाचे नाव आहे कैलास घोरपडे... दुपारी घराबाहेर न पडता घरी कामाच्या ठिकाणी कूलर, फॅन, एसी आदी उपकरणे लावून तीव्र उन्हापासून नागरिक संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ताक, लस्सी, सरबत आदी थंड पदार्थांचे सेवन वाढले आहे.
अहो आश्चर्य! उन्हापासून संरक्षण म्हणून ‘त्याने’ चक्क टोपीलाच बसविला ‘सोलर फॅन ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 5:16 PM
आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला
ठळक मुद्दे तीव्र ऊन आणि गरम हवेपासून संरक्षण यासाठी नवीन शक्कल लढवलीगाडीवरच्या प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी या फॅनमुळे कुठलाही त्रास नाही.