पुणे : अवघ्या दोन महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा झालेला मृत्यू खासगी रुग्णालयाने लपविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल एक आठवड्यानंतर माहिती देण्यात आली आहे. पालिकेकडे या मृत्यूची नोंद तात्काळ न होता आठवड्यानंतर का करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे.रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात ३ जून रोजी दोन महिन्यांच्या बाळाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा ७ जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाला या प्रकारचा पत्ताच नव्हता. ही माहिती आम्हाला देण्यात आली नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. कोरोनाची दैनंदिन आकडेवारी तयार करण्यात येत असतानाही ही माहिती 'मिस' होण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या विविध कोविड सेंटर्ससह खासगी रुग्णालयांमधून दररोजचा अहवाल एकत्रित केला जातो. तरीदेखील ७ जूनला झालेल्या मृत्यूची नोंद पालिकेकडे का करण्यात आली नाही आणि ही माहिती का कळविण्यात आली नाही. सात जूनला घडलेल्या घटनेची नोंद एक आठवड्याने करण्यामागचे प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रकाराबाबत रुग्णालयाला नोटीस देण्याची तयारी पालिकेने चालविली असून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात असल्याचे अधिका?यांनी संगितले.
दोन महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा मृत्यू लपवला? पुण्याच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 7:25 AM
रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात ३ जून रोजी दोन महिन्यांच्या बाळाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
ठळक मुद्देपालिका मागविणार खुलासा; आरोग्य विभागाला तब्बल एक आठवड्यानंतर माहिती