पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा शहरासह ग्रामीण भागातील २४ गावांमधील २१८ संशयित रुग्णांपैकी ८९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मागील तीन महिन्यांतील एकाच दिवसातील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह येणे हा उच्चांकी आहे.
सासवड येथील शासकीय लॅबमधील मंगळवारी (दि.३०) ११३ संशयित रुग्णांनाची कोरोना चाचणी तपासण्या करण्यात आलेल्या पैकी ५८ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सासवड शहरांमधील ३९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये झेंडेवाडी येथील ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. आहेत. भिवरी २, पिसर्वे, सोनेरी, टेकवडी, वनपुरी, कोथाळे, चांबळी, वीर, हारगुडे, टेकवडी, साकुर्डे, सटलवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले . जेजुरी येथील शासकीय लॅबमधील १० गावातील १०५ संशयित रुग्णांनाची कोरोना चाचणी केली असता३१ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी येथील १२, जवळार्जुन ५, नीरा ५, साकुर्डे, बेलसर येथील प्रत्येकी २, आंबी, कोथळे, नाझरे, मांडकी, मावडी पिंपरी येथील प्रत्येकी एक असे एकूण ३१ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
पुरंदर तालुक्यातील शहरी भागातील सासवड, जेजुरी, नीरा एकूण ५६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ग्रामीण भागातील ३३ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असून तालुक्यातील आज दिवसभरात ८९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.