शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पाणी, वाहतूक प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य

By admin | Published: January 26, 2016 1:48 AM

संपूर्ण शहराला एकसमान २४ तास पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवत पाणीपट्टीमध्ये २२ टक्क्यांची वाढ सुचविलेले, रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करून पादचारी

पुणे : संपूर्ण शहराला एकसमान २४ तास पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवत पाणीपट्टीमध्ये २२ टक्क्यांची वाढ सुचविलेले, रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करून पादचारी व सायकलस्वारांना प्राधान्य देणारे, नवीन उड्डाणपूल व रस्त्यांची घोषणा न करता सध्या काम सुरू असलेले जुने प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्याने निधी उपलब्ध करणारे, पालिकेच्या सेवांमध्ये जास्तीत जास्त आॅनलाइन सुविधांवर भर असलेले ५ हजार १९९ कोटी रुपयांचे २०१६-१७ साठीचे अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सोमवारी सादर केले.मागील वर्षी आयुक्तांनी मांडलेल्या २०१५-१६ या अंदाजपत्रकाच्या तुलनेत १२०० कोटी रुपयांनी वाढ असलेले २०१६-१७ चे अंदाजपत्रक आयुक्तांनी मांडले. यंदा प्रथम पुणे महापालिकेने अंदाजपत्रकामध्ये ५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अंदाजपत्रकामध्ये एकसमान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक धोरण व शहर पायाभूत सुविधा या कामांसाठी स्वतंत्र निधी उभारणाची तरतूद करण्यात आली आहे. या कामांसाठी उपलब्ध होणारा निधी थेट या स्वतंत्र खात्यामध्ये जमा होणार असून तो फक्त याच कामांसाठी वापरला जाणार आहे. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामांसाठीचा निधी इतरत्र वापरला जाऊ नये, याकरिता हा स्वतंत्र निधी उभारण्यात येणार असल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.शहरातील सर्व प्रभागांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन विकसित, अविकसित व विकसनशील अशी प्रभागांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार अविकसित प्रभागांना जास्त निधी अंदाजपत्रकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जेएनयूआरएम, स्मार्ट सिटी व अमृत प्रकल्पांसाठी ५०१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकसमान पाणीपुरवठा योजनेसाठी २९० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामासाठी १५३ कोटी, जायका राष्ट्रीय नदी सुधार योजनेसाठी १३० कोटी रुपये, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजसाठी ११७ कोटी, बंद नलिकेचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपये, वडगाव डब्ल्यूटीपी प्रकल्पासाठी ३० कोटी, उच्च दर्जाच्या पदपथांची निर्मिती करण्यासाठी ७५ कोटी, सायकल प्रकल्पासाठी २५ कोटी असा प्रामुख्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उत्पन्नात ५५ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. शासकीय अनुदान व इतर उत्पन्नामध्ये ७०० कोटी, बांधकाम विकास शुल्कात १५० कोटी रुपयांची वाढ धरण्यात आली आहे.यंदा अंदाजपत्रकाने पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडल्याने आता पुणेकरांच्या पदरी काय-काय पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)