शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उच्चशिक्षित बेरोजगारांत वाढ

By admin | Published: April 10, 2017 2:26 AM

रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्राकडे असलेल्या माहितीनुसार राज्यात ३५,७३,२५५ सुशिक्षित व व उच्चशिक्षित

पुणे : रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्राकडे असलेल्या माहितीनुसार राज्यात ३५,७३,२५५ सुशिक्षित व व उच्चशिक्षित उमेदवारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ९,२२,८४ महिला असून त्यांची टक्केवारी २५.४५ आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अशा क्षेत्रांसह दहावी,बारावी उत्तीर्ण युवक युवतींचा त्यात समावेश आहे. रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्राच्या ३१ डिसेंबर २०१६ अखेर असलेल्या नोंदीनुसार ही माहिती आहे. २००४ पासून उमेदवारांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी रोजगार विनिमय केंद्रामध्ये नोंदणी असणे आवश्यक असल्याने नोंदणी करण्याचे प्रमाण पुर्वीपासूनच मोठे आहे. पुर्वी नोंदणी केलेल्या एखाद्या उमेदवाराने नोंदणी नुतनीकरण केले नाही, तर ती नोंदणी रद्द होत असे. नंतर नुतनीकरणाची मुभा ३ वर्षे करण्यात आली. सध्या ही नोंदणी आॅनलाईन झाली असून ती रद्द केली जात नाही. पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या युवकांपैकी वैद्यकीय पदवी असलेले ३२१ जण असून त्यामध्ये १३७ महिला आहे. एकूण वैद्यकीय पदव्युत्तर पदवी असलेल्या ३८.५ टक्के युवतींनी रोजगार विनिमय केंद्रामध्ये नोंदणी केली आहे. पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या अभियांत्रिकी /तंत्रज्ञान क्षेत्रातील ३३६० युवक तर ९१३ महिलांची रोजगार विनिमय कें द्रामध्ये नोंद असून महिलांचे प्रमाण ३२ टक्के आहे. पदविका प्राप्त उमेदवारांची संख्या अधिक २,२१, ८५४ असून त्यामध्ये महिला ८५, ४९५ आहेत. एकूण महिलांचे प्रमाण त्यामध्ये ३८.५३ टक्के आहे. पदविका प्राप्त केलेल्या अभियांत्रिकी / तंत्रज्ञान क्षेत्रातील ६७,९५३ युवकांनी आणि १६, ३०९ महिलांनी उमेदवार म्हणून नोंदणी केली आहे. महिलांचे त्यामधील प्रमाण २४ टक्के आहे. पदविका प्राप्त वैद्यकीय, डी.एम.एल.टी. व औषधी निर्माण क्षेत्रातील १७, ८६६ युवकांनी तर ६, ६१० युवतींनी नोंदणी केली असून महिलांचे प्रमाण ३७ टक्के आहे. इतर माध्यमांमधील पदविकाधारकांपैकी १लाख ३६हजार ६५ युवक व ६२,५७६ युवतींनी नोंदणी केली आहे. महिलांचे प्रमाण ४६ टक्के आहे. पदवीधरांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञानातील ६२,२७९ युवक , १६,८१५ युवती असून युवतींचे प्रमाण २७ टक्के आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्रातील २७३० युवक आणि १२५९ युवती यांची नोंद असून महिलांचे प्रमाण ४६.१० टक्के आहे.(प्रतिनिधी)एकूण पदवीधरांमध्ये इतर माध्यमातील ५,७७, ६६९ युवक आणि १,९६,४०७ युवकांची नोंदणी केली असून महिलांचे प्रमाण ३४ टक्के आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षित व शिकाऊ उमेदवारांपैकी २,१९,८७१ युवक आणि २१,९८७ युवती असून युवतींचे प्रमाण १० टक्के आहे. माध्यमिक शालांत परीक्षेपेक्षा कमी निरक्षर धरुन २,७२, ९३६ युवक आणि ६२,७७७ युवतींनी नोंदणी केली असून महिलांचे प्रमाण २३ टक्के आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण १०,६४, २९१ युवक आणि २,२८,८२३ असून युवतींचे प्रमाण २१.५० टक्के आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेले १०,४७८८९ युवक आणि २,६१,९७१ युवतींची नोंद असून महिलांचे प्रमाण २५ टक्के आहे.