लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात ३१४ रूग्णांची वाढ झाली. ही वाढ आठवड्याभरात झालेल्या सर्वाधिक वाढ आहे. मंगळवारच्या तुलनेत रुग्णांचा आकडा ९० ने वाढ झाली. तर, बरे झालेल्या २४६ रुग्णांना घरी सोडले आहे. विविध रुग्णालयातील २१२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ७२५ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २८७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६९० झाली आहे. पुण्याबाहेरील २ मृत्यूची नोंद केली.
दिवसभरात एकूण २४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ७७४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८२ हजार १८९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ६९० झाली आहे.
---
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९०७ नागरिकांची स्वाब तपासणी केली असून आतापर्यंत ९ लाख ६८ हजार ११६ रूग्णांची तपासणी केली आहे.