पुणे : पुण्यातील कमाल तापमानाची गेल्या १० वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी झाली़ पुण्यात ३९़७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ लोहगाव येथे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत होती़ रविवारी ३८़८ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ यापूर्वी मार्च महिन्यात सर्वाधिक कमाल तापमान ३० मार्च २००७ रोजी ३९़६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ पुण्यातील सर्वाधिक कमाल तापमान २८ मार्च १८९२ मध्ये ४२़८ अंश सेल्सिअस नोंद झाली होती़ दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे़ सोमवारी शहरातील किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ लोहगाव येथे २२ अंश सेल्सिअस इतके होते़
पुण्यात १० वर्षांतील उच्चांकी ३९़७ तापमान
By admin | Published: March 28, 2017 3:04 AM