शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

द्रुतगती महामार्ग बनला पैसे कमाविण्याचा ‘मार्ग’

By admin | Published: December 08, 2014 1:14 AM

वाढत्या अपघातांमुळे चर्चेत असणारा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता लूटमारीमुळेही चर्चेत येऊ लागला आहे. लूटमारीचेही दोन प्रकार आहेत.

मंगेश पांडे, पिंपरीवाढत्या अपघातांमुळे चर्चेत असणारा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता लूटमारीमुळेही चर्चेत येऊ लागला आहे. लूटमारीचेही दोन प्रकार आहेत. हत्याराचा धाक दाखवून अथवा धमकी दमदाटी करून केलेली लुटमार, तर दुसरी मदतीच्या नावाखाली प्रवाशांची होत असलेली लूटमार आहे. काही जणांसाठी तर हा महामार्ग म्हणजे पैसे कमाविण्याचा मार्ग बनला आहे. क्रेनसाठीही जादा पैसेअपघात झाल्यास अथवा वाहन बंद पडल्यास मदतीसह अपघातग्रस्ताला मानसिक आधार देणेही आवश्यक असते. अपघातातील वाहन बाजूला घेणे, वाहतूककोंडी झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना राबवून वाहतूक सुरळीत करणे महत्वाचे असते. त्यासाठी क्रेनची आवश्यकता असते. रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संबंधित कंपनीकडून काहीठिकाणी अल्पदरात क्रेनही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अपघात होताच कंपनीऐवजी इतर खासगी क्रेन घटनास्थळी दाखल होतात. अपघातात वाहनाचे नुकसान झालेल्या मालक अथवा चालकावरच अरेरावी करीत त्याच्याकडून मनाप्रमाणे पैसे उकळले जातात. अपघातग्रस्त वाहनचालकाला पैसे देण्याशिवाय पर्याय नसतो. अपघाताच्यावेळी वाहन उचलताना पैसे उकळण्याची संधी असते. यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी क्रेनचालकांमध्ये स्पर्धाच असते. कंपनीच्या क्रेनने वाहन उचलून बाजुला ठेवल्यास पुढे इतर क्रेनने वाहन नेणे शक्य होते. मात्र, तसे होत नाही. फिटरही कमवातात मनाप्रमाणे पैसेमहामार्गावर असलेले फिटरदेखील मनाप्रमाणेच वाहन दुरूस्तीचे पैसे आकारतात. हे प्रकार खालापूर टोल नाका ते खंडाळा या ‘घाटसेक्शन’ मध्ये मोठ्याप्रमाणात चालतात. क्रेन व फिटरशी संबंधित काहीजण महामार्गावर घिरट्या घालत असतात. याच भागात घाट चढताना वाहने बंद पडण्याच्या अनेक घटना घडतात. वाहन बंद पडल्याचे आढळताच तातडीने त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्रेन व फिटरला कळविले जाते. वाहनमालकासाठी वाहन दुरूस्त होणे गरजेचे असते. त्यामुळे हवे तितके पैसे मोजून वाहन दुरूस्त करून घेतले जाते. बाहेरच्या जिल्ह्यातील अथवा राज्यातील वाहनचालकांना कोंडीत पकडले जाते. महामार्गावरील पोलीस मदत केंद्रात पूर्णवेळ कर्मचारी हजर असणे आवश्यक आहे.