शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 6:30 AM

महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता.

सूर्यकांत किंद्रे भोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.सूर्यकांत किंद्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कभोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.