पुणे : संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी अध्यक्ष, मराठी-हिंदी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी साहित्यात भरीव व मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी डॉ. कामत यांची निवड करण्यात आली आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबई येथील रंगशारदा नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. डॉ. अशोक कामत हे गेल्या अनेक दशकांपासून हिंदी-मराठी साहित्य लेखनात कार्यरत आहेत. श्री नामदेव एक विजययात्रा, संत तुकाराम, श्री ज्ञानेश्वर स्वरूप दर्शन अशा १०० हून अधिक मराठी ग्रंथाचे तर मराठी संतो की हिंदी वाणी प्राचीन हिंदी काव्य जीवनधारा आदी ५० हून अधिक हिंदी पुस्तकांचे लेखन-संशोधन करून त्यांनी समाजाला संत साहित्याचे विपुल भांडारच उपलब्ध करून दिले आहे.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘हिंदी साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:57 AM
संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे माजी अध्यक्ष, मराठी-हिंदी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठळक मुद्देहिंदी साहित्यात भरीव व मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तीस देण्यात येतो पुरस्कारडॉ. अशोक कामत हे गेल्या अनेक दशकांपासून हिंदी-मराठी साहित्य लेखनात कार्यरत