शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

हिंजवडी - माण रस्त्यावरील बोडके वाडी फाटा पाण्याखाली; आयटी पार्क मधील वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:55 AM

आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.

हिंजवडी : आयटीपार्क परिसरात मागील चोवीस तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली झाली आहे. आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.

त्यात, साचलेल्या पाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाल्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रामुख्याने, येथील गवारेवाडी आणी बोडकेवाडी फाट्यावर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, जगविख्यात आयटी पार्क मधील बहुतांश रस्त्यांची आधीच खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यात, मागील चोवीस  तासाहून अधिक काळ, माण, हिंजवडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक मंदावली आहे.  

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसPuneपुणे