पिरंगुट : मुळशी धरणातून शुक्रवारी (दि. १) एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, मुळा नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा तहसीलदार प्रशांत ढगे यांनी गुरुवारी दिला आहे.गुरुवारी धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या तीन तासांत धरणात २३ टीएमसी पाणीसाठ्याची आवक झाली असून, ७५ टक्के धरण भरले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास पुढील २४ तासांत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी जादा पाणी खाली सोडावे लागणार आहे.मासेमारी करणारे, पोहणारे, नदीकाठचे शेतकरी आणि निवासी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तालुक्यातील सर्व तलाठ्यामार्फत नागरिकांना देण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली. ं
नदीकाठच्या नागरिकांना इशारा
By admin | Published: August 01, 2014 5:30 AM