पुणे : सात महिन्यांच्या छकुलीला उराशी कवटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने निवडणुकीचा तब्बल १४ तासांचा बंदोबस्त निभावला. मुलीला कडेवर घेऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या या महिला पोलिसाला पाहून मतदान करायला आलेले मतदारही क्षणभर हेलावले. कोंढव्यामधील लेडी हलीमा उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर येरवडा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी गौरी महेशचंद्र शिंदे या बंदोबस्तावर होत्या. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे. सिद्धी नाव असलेल्या या गोंडस मुलीला सांभाळण्यासाठी घरामध्ये कोणीही अन्य व्यक्ती नसल्यामुळे तिला कोठे ठेवायचे, असा प्रश्न होता. शिंदे यांच्या सासूचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तसेच, सिद्धीला सांभाळण्याचा आणि तिच्या दुधाचा प्रश्न होता.मतदानाचा दिवस असल्यामुळे शिंदे यांच्या पतीला सुटी होती. पत्नीच्या कामाचा ताण आणि मुलीची जबाबदारी ओळखून महेशचंद्र हे दिवसभर मतदान केंद्राच्या बाहेर बसले होते. सिद्धीला आईकडे देऊन ते बाहेर थांबले होते.(प्रतिनिधी)
बंदोबस्तावर ‘हिरकणी’
By admin | Published: October 16, 2014 6:02 AM