शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

हिरकणी कक्ष कागदावरच

By admin | Published: March 14, 2016 1:26 AM

महापालिकेतील स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष अशा नावाने विश्रांती कक्ष सुरू करण्यास प्रशासनाला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप जागा मिळालेली नाही.

पुणे : महापालिकेतील स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष अशा नावाने विश्रांती कक्ष सुरू करण्यास प्रशासनाला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप जागा मिळालेली नाही. भवन रचना, नागरवस्ती विभाग, कामगार विभाग यांच्यात याअनुषंगाने गेले वर्षभर टोलवाटोलवी सुरू आहे.राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयांमध्ये असा कक्ष सुरू करण्यासंबंधी वर्षभरापूर्वी आदेश दिले आहेत. मुलांना स्तनपान करण्यासाठी; तसेच गर्भवती महिलांना विश्रांतीसाठी म्हणून असा कक्ष त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यात देण्यात आल्या होत्या. त्या त्या सरकारी आस्थापनेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी; तसेच तिथे कामासाठी म्हणून येणाऱ्या नागरिक महिलांसाठीही या कक्षाचा वापर व्हावा, असा हेतू त्यामागे आहे.महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. कामानिमित्तानेही महापालिकेत दररोज अनेक महिला येत-जात असतात. त्यांच्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सध्या अशी काहीच व्यवस्था नसल्याने त्यांची अडचण होते. एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक महिलेने तर मुलाला स्तनपान करता यावे, यासाठी पालिकेच्या समोरच एक खोली भाडेतत्त्वावर घेतली आहे. तिथे दिवसभर सासूला व मुलाला ठेवून ही महिला वेळ मिळेल त्याप्रमाणे तिथे जाऊन परत कार्यालयात येते. कामासाठी येणाऱ्या काही गरीब महिला इमारतीच्या कडेला सावलीत बसून ही गरज भागवतात. हिरकणी कक्ष झाला तर ही अडचण कायमची दूर होणार आहे.असे असूनही प्रशासनाकडून जागा नाही, असे कारण दाखवत विषय लांबणीवर टाकला जात आहे. सुरुवातीला कामगार विभागाने असा कक्ष सुरू करण्याबाबत नागरवस्ती विभागाला कळवले. त्यांनी भवन रचना विभागाला जागा देण्याबाबत पत्र दिले. काही महिन्यांनी या विभागाने नागरवस्ती विभागाला तुमच्याच कार्यालयातील जागा या कक्षासाठी उपलब्ध करून द्यावी म्हणून कळविले. मग नागरवस्ती विभागाने त्यांना आमच्याकडे अशी जागा उपलब्ध नाही म्हणून कळवले. कामगार कल्याण विभाग अजूनही या दोन कार्यालयांकडून काही होईल म्हणून वाट पाहत आहे. कोणी विषय उपस्थित केला की, वरिष्ठांकडून याबाबत कार्यालयांकडे विचारणा होते व नंतर विषय फाईलबंद होतो. या पत्रव्यवहारातच वर्ष संपले असून, हिरकणी कक्ष मात्र अद्याप कागदावरच आहे. (प्रतिनिधी)