शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:18 AM

हिरकणी कक्षाबाबत महामंडळाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राजगुरुनगर आगारात आहे.

राजगुरुनगर : तान्हुल्या बाळांना स्तनपान करता यावे, या हेतूने मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना एसटी महामंडळाने केली. मात्र, या हिरकणी कक्षाबाबत महामंडळाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राजगुरुनगर आगारात आहे.तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी एसटीने आपल्या बस स्थानकात हिरकणी कक्षाची निर्मिती केली. मात्र मातांना बसस्थानकात असा कक्ष आहे, याची माहितीच नसल्याचे दिसते. कक्षात जाण्यास माता बिचकतात, हिरकणी कक्ष कुलूपबंद असतो, कक्षात अस्वच्छता आणि अडगळ असल्याचे ठिकठिकाणी दिसते. या परिस्थितीत हिरकणी कक्ष बंद आणि रिकामेच राहत आहेत.दरम्यान, बसवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गाडी चुकेल या भीतीने हिरकणी कक्षाचा वापर महिलांकडून केला जात नाही. महामंडळामार्फत या कक्षाबाहेर या कक्षाबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आलेले नाहीत. शिवाय या सुविधेची उद्घोषणाही केली जात नसल्याचे आढळून आले आहे. हिरकणी कक्षाबद्दल मातांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे हिरकणी सुविधेबद्दल महामंडळाला आणखी जागरूकता करावी लागणार असून, हिरकणी कक्ष कुलूपबंद न ठेवता सहज उपलब्ध होतील, असे ठेवावे लागणार आहेत.योजना प्रभावी राबविण्यास उदासीनताराजगुरुनगर आगारात प्रवाशी महिलांकडे हिरकणी कक्षाबद्दल विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मातांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. हिरकणी कक्ष ही संकल्पना उत्तम असली तरी ही संकल्पना प्रभावीपणे राबवली मात्र जात नाही. वल्लभनगर, राजगुरुनगर, नारायणगाव या बसस्थानकांतील हिरकणी कक्षाबद्दलचे महाराष्ट्रातील प्रातिनिधिक चित्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळ