शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

पुरातन बाबीरबुवांच्या यात्रेला ऐतिहासिक वारसा

By admin | Published: March 31, 2017 2:14 AM

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रूई गावाला समृध्द परंपरा आहे. बाबीर रूई गाव हे अतिशय सुंदर

कळस : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रूई गावाला समृध्द परंपरा आहे. बाबीर रूई गाव हे अतिशय सुंदर व निसर्गरम्य निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले, इतिहासाची समृद्ध परंपरा असलेले गाव आहे. डोंगररांग परिसर, गावातील अतिशय रम्य डोळ्यांचे पारण फेडणारा डोंगराळ भाग, काळेभोर पाषाण, दगड, हिरवागार निसर्ग, स्वच्छ ताजी भरपूर हवा,अतिशय पुरातन असलेल्या या जागेवर बाबीर मंदिर आहे.बाबीरदेव हा ऐतिहासिक गाव रूईचा अनमोल ठेवा. फार पुरातन कालावधीतील डोंगरावर उंचीवर बाबीर देव आहे. त्या तेथे दगडी बांधकाम केलेले भव्य मंदिर आहे. मंदिरामध्ये एक इलुमाता व बाबीरदेव यांच्या मूर्ती आहेत. या देवावर पशुपालक लोकांची फार श्रद्धा आहे. त्यांच्यापासून रूईचा इतिहास बदलला. या देवांमुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश लोक दर्शनासाठी येतात. याची महती एवढी वाढली आहे, की परदेशातूनही लोक येऊ लागले आहेत. या देवाबद्दल तशा अनेक दंतकथा व लोककथा प्रसिद्ध आहेत.बाबीरदेवाची आई येलुमातेने १२ वर्षे शिवभक्ती केली. तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन तिच्या पोटी जन्म घेतला. गायी चारत असताना बासरी वाजली की सर्व बाबीरदेवाभोवती गोळा होत, असे सुरू असताना एके दिवशी काही लोक जे लुटारू होते, त्यांनी बाबीरदेवावर हल्ला केला. त्या वेळी त्यांचे वय फक्त १२ वर्षे होते. त्या वेळी धाडसाने आलेल्या परिस्थितीला तोंड देत लढाई केली. त्यात त्यांना वीरमरण आले. त्या जागेला सायाळीचे बिळ म्हणतात. ती गुहा आजही आहे, अशी आख्यायिका आहे. त्या काळी चालत असलेल्या प्रथेप्रमाणे बाबीरबुवांचे वीरगळ बांधले. (वार्ताहर)जुने जाणते लोक सांगतात की, मंदिर बांधकाम करताना त्या वेळी समाधी उघडली असता त्यात काठी घोंगड्याचे काही भाग पाहायला मिळाले. त्यांच्या वीरमरणास अभिवादन म्हणून लोक दीपावली पाडवा, माघ पौर्णिमा व गुढीपाडव्याला दर वर्षी जमतात. तसेच ज्यांना दिवाळीतील यात्रेला येणे शक्य होत नाही, ते फेब्रुवारी महिन्यातील माही पौर्णिमेच्या यात्रेत येतात. यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. घोंगडी बाजारपेठ, लाकडी खेळणी यामध्ये दिवाळी पाडव्याला मोठी उलाढाल होते. पारंपरिक गजेढोल स्पर्धा भरवली जाते. तसेच माघी यात्रेला जंगी कुस्ती आखाडा भरतो. गुढीपाडव्याला अखंड हरिनाम सप्ताह होतो. तसेच भाकणूक सांगितली जाते.