पुणे : महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रचे आराध्यदैवत असलेल्या अष्टविनायकांमध्येही महिलाशक्तीचा जयघोष झाला.
गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये, संस्थांमध्ये महिलांच्या हस्ते आर‘ती’ करण्यात आली. पारंपरिक वेशात आलेल्या महिलांनी आज गणेशोत्सवाचे वातावरणच वेगळे झाले होते.
अष्टविनायंकातील पहिला असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वराची आरती पंचायत समितीच्या माजी सभापती अमृता गार्डे, अंजली ढेरे, सुवर्णा धारक, दीपाली धारक, श्रुती धारक, वैशाली धारक, आशा तावरे, उषा शिंदे, सुनंदा धारक, मनीषा गुरव, कालिंदी धारक, लता ढोले, सुरेखा ढोले, रोहिणी गुरव ल, सुरेखा तावरे, सविता गाडे, नीलिमा गाडे, नीता गाडे, अंजली ढेरे, स्वाती गोसावी, प्रतिभा धारक, वृशाली धारक यांनी केली. दर्शनासाठी आलेल्या भाविक महिला देखील उत्साहाने सहभागी झाल्या.
रांजणगाव येथील श्री महागणपतीची आरती जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर,सरपंच सुरेखा लांडे,माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर,महिला पोलीस,देवस्थानच्या महिला कर्मचारी व ग्रामस्थ महिला सहभागी झाल्या होत्या.
सिध्दटेकच्या (ता.कर्जत)श्री सिध्दीविनायकाची आरती राशीन पंचायत समिती सदस्य अश्विनी कानगुडे, माधुरी लोंढे,सिद्धटेक-बेर्डी सरपंच मिरा मोरे,नंदा भोसले,आशालता पाटील,राशीन येथील शुभांगी मोढळे,राजश्री सायकर,प्रिंयका गुरव,पुजा गुरव,योगिता कळसकर यांच्यासह भाविक महिलांच्या हस्ते झाली.
श्री क्षेत्र ओझर येथील विघ्नहराची आरती ओझर गावच्या सरपंच अस्मिता कवडे, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई मांडे, गौरी बेनके, शारदा टेंभेकर यांच्या हस्ते झाली. श्रीक्षेत्र लेण्याद्री येथील गिरिजात्मजाची आरती जुन्नरच्या पोलीस उपनिरीक्षक शितल चव्हाण ,शेतकरी गटाच्या अध्यक्षा पल्लवी डोके,उपाध्यक्षा छाया बिडवई ,वृषाली ताम्हाणे चित्रा कोकणे, लता डोके, सविता माळी आदी महिलांच्या हस्ते झाली.
रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वराची आरती भाविक महिलांच्या हस्ते करण्यात आली. महड येथील वरदविनायकाची आर‘ती’ करण्याचा मान उपस्थित भाविक महिलांना मिळाला.