शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

नीरा येथे चित्ररथातून उलगडला एसटीचा इतिहास

By admin | Published: November 18, 2016 5:56 AM

महाराष्ट्रात १९४८मध्ये सुरू झालेली एसटी बस आजपर्यंत कोणत्या स्वरूपात बदलत गेली, याची उत्सुकता आपणा सर्वांनाच असते.

सोमेश्वरनगर : महाराष्ट्रात १९४८मध्ये सुरू झालेली एसटी बस आजपर्यंत कोणत्या स्वरूपात बदलत गेली, याची उत्सुकता आपणा सर्वांनाच असते. स्वांतत्र्यानंतरच्या काळात बससेवेत आमूलाग्र बदल झाला. हा बदल चित्ररूपाने नीरा येथील प्रवाशांसमोर चित्ररूपाने उलगडला. चित्ररथ पाहण्यासाठी चिमुकल्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व एसटीप्रेमी यांच्या वतीने एसटीची माहिती, तिचा इतिहास व सध्याचा प्रवास कुठून व कासा सुरू आहे? याबद्दल माहिती प्रवासी व नागरिकांना व्हावी म्हणून जिल्ह्यात चित्ररथ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्ररथ पुढील १५ दिवस पुणे जिल्ह्यात सर्वत्र फिरणार आहे. आज नीरा येथील बस स्थानकामध्ये हा रथ आला. एसटीचा इतिहास सांगणारा हा रथ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रवाशांबरोबर महात्मा गांधी विद्यालय, किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय, लिलावात रिखवलाल शहा कन्याशाळा, ज्युबीलंट इंग्लिश स्कूल आदी शाळांतील मुलांनीही या चित्ररथाच्या माध्यमातून एसटीचा इतिहास समजून घेतला. यामध्ये सुरुवातीला सुरू झालेल्या बसपासून ते सध्या आधुनिक स्वरूपातील बसची विविध मॉडेल, त्या काळातील छायाचित्रे, एसटीची जुनी तिकिटे, पहिल्या कामगारांचे ओळखपत्र, जुने दस्तऐवज, ठेवण्यात आले आहेत. एसटीप्रेमी संतोष भिसे हे येणाऱ्यांना एसटीचा इतिहास सांगत होते. त्यामुळे लोकांना हा इतिहास समजला. या वेळी एसटीच्या वतीने बारामती व पुरंदर आगारांचे वाहतूक निरीक्षक इसाक सय्यद व प्रकाश भुजबळ यांनी १९४८मध्ये ही सेवा सुरू झाल्यापासून एसटीने कशा प्रकारे प्रवास केला, याची माहिती दिली.