पिंपरी : थकीत असलेल्या वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या जनमित्रास थकबाकीदार व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण केली. ही घटना डबरचाळ, बोपोडी येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस अटक केली आहे.प्रवीण भगवान पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. महावितरणच्या खडकी शाखेचे महेश राठोड, पद्माकर म्हात्रे, वैभव गोसावी हे जनमित्र थकबाकीदारांंचे वीज खंडित करण्याची कार्यवाही डबरचाळ, बोपोडी येथे करीत होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रवीण पवार याच्या घराचे वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला. त्याच वेळी पवार मित्रासह तेथे आले. वीज खंडित का केला अशी विचारणा करीत, राठोड यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. तेथे असलेले जनमित्र म्हात्रे व गोसावी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली.(प्रतिनिधी)
वीज कर्मचाऱ्यांस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 12:52 AM