पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांना शिस्त लागावी, या हेतूने वाहतूक शाखेने कडक धोरण स्वीकारले असून १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत़, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २७९ वाहनचालकांचे पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले आहेत़ शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊ लागली आहे़ त्याला काहीअंशी बेशिस्त वाहनचालकही कारणीभूत आहेत़ हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरुवात केली. वाहतूक शाखेने १ हजार ८६२ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी ६ महिन्यांसाठी रद्द केले आहेत. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या १ हजार ५०३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ३३८ जणांचा समावेश आहे़ यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणाºयांची संख्या सर्वाधिक आहे़ त्याखालोखाल भाडे नाकारणाºयांची संख्या आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ३५ परवाने विचाराधीन असल्याची वाहतूक शाखेचे नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करून हे अर्ज पाठविण्यात येतील. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय त्यांचे अर्ज फेटाळूही शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
नियमभंग करणाऱ्या २७९ जणांचे पासपोर्ट रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:28 AM