नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कृती, कौशल्याधारित शिक्षणावर भर देणारे आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करावीत, त्यानुसार योग्य मूल्यमापन करून गुणांच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावे, असे असताना कला शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी विद्यार्थी कलेमध्ये प्रवीण व्हावेत यासाठी प्रयत्न करीत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या कलेचे योग्य मूल्यमापन करणा-या परीक्षेचे आयोजन रद्द करणे, परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुण नाकारणे अशा स्वरूपाचा अतिशय दुर्देैवी निर्णय दि.२६ मार्च २०२१ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेऊन रेखा कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एसएससी बोर्डाने प्रस्ताव मागवून ही दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारा ते तेरा हजार विद्यार्थी मग संपूर्ण राज्याचा विचार करता अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा निर्णय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे शासकीय रेखा कला परीक्षेचे आयोजन करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने शासनाकडे केली आहे व तसे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री दिले आहे, असे पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागर यांनी सांगितले.
———————————————————————