हिंजवडी : मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना नियमित वेळेपेक्षा लवकर कंपनीतून सोडण्यात आले. ‘आयटीयन्स’ला सोमवारी कामावरून परतताना कसरत करावी लागली असल्याचे दिसून आले.मावळ व मुळशी तालुक्यात मूसळधार पाऊस होत असल्याने मुळशी आणि पवना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी - चिंचवडसह उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद केले आहे. पिंपरी-चिंचवड व परिसरात सर्वत्र पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयटीपार्कमधील अनेक कंपन्यांनी सोमवारी सुटी जाहीर केली होती. काही कर्मचाºयांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या होत्या. कामावर हजर असलेल्या ‘आयटीयन्स’ला पावसाचा जोर कायम असल्याने कंपनीतून लवकर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयटीपार्कमध्ये जाणारे प्रमुख रस्ते काही ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत. मुळा, मुठा, पवना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने औंध, वाकड, चिंचवडसह अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ‘आयटीयन्स’ना कंपनीतून लवकर सोडण्यात आले.मूसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली होती. काहींना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या होत्या. काही कारणास्तव हजर असलेल्या ‘आयटीयन्स’ना कामावरून लवकर सोडण्यात आले. - कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद केले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून कामावरून लवकर सोडण्याच्या सूचना केल्या आहेत.- संदीप देशमुख, अभियंता, हिंजवडी
हिंजवडी-माणमधील कंपन्यांकडून ‘आयटीयन्स’ना सुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 7:06 PM
मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना नियमित वेळेपेक्षा लवकर कंपनीतून सोडण्यात आले.
ठळक मुद्देहिंजवडी-माणमधील कंपन्यांकडून ‘आयटीयन्स’ना सुटी बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले : सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय