शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

कोंढव्यात वेबसाईटद्वारे हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:13 PM

हुक्का पॉर्लरवर बंदी असताना वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना तसेच हुक्का पॉर्लरवर बंदी असताना वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात करुन घरपोच डिलिव्हरी देणार्‍या तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.मित विजय ओसवाल (वय १९, रा. वानवडी बाजार), रॉयल जयराम मधुरम (वय २८, रा.लुल्लानगर, कोंढवा) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४, रा. भवानी पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ हुक्का पॉट, ६ तंबाखुजन्य फ्लेवरची पाकिटे, ४ मोबाईल फोन व २ मोपेड असा ८४ हजार १००रुपयांचा माल जप्त केला आहे.गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांना व्हॉटस हॉट या वेबसाईटवर मोबाईल नंबर टाकून हुक्क्याची जाहिरात केली जात असून हुक्का विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस  आयुक्त शिवाजीपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन माहिती काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महाडिक, हवालदार मगर, गुरव, गरुड, साबळेआणि चौधर यांनी बनावट ग्राहकांच्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधला.त्यांना कोंढव्यातील लुल्लानगर येथील लुल्ला गार्डनजवळ बोलविण्यात आले. तेथे पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा हुक्का विक्रीसाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतले.त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र कोविड १९ नियम, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ नुसारतसेच १८८, २६९, २७०, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :KondhvaकोंढवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक