शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

घरातल्या फर्निचरचा आयुष्यावरही परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:11 AM

आपण एखादे घर घेतल्यानंतर बांधल्यानंतर किंवा फ्लॅट घेतला की त्यामध्ये आवर्जून फर्निचर करतो. कारण, ज्यांनी आपल्या घराचे उत्तम फर्निचर ...

आपण एखादे घर घेतल्यानंतर बांधल्यानंतर किंवा फ्लॅट घेतला की त्यामध्ये आवर्जून फर्निचर करतो. कारण, ज्यांनी आपल्या घराचे उत्तम फर्निचर केले आहे त्यांना माहीत असेल की सुंदर फर्निचर केलेल्या घरांमध्ये राहण्याचा आनंद हा खूप जास्ती वेगळा आणि खूप ऊर्जा देणारा असतो. परंतु हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून चित्रे पाहून कोणत्याही इंटेरियरवाल्याचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने देखील बरेच लोक आपल्या घराचे इंटेरियर करतात. हरकत नाही, पण इंटेरियरचा सेन्स नसेल तर घर म्हणजे सर्कसचा तंबू होऊन जाईल. इंटेरियर डेकोरेटरसना सगळा अभ्यास अनुभव असल्याने त्यांनी दिलेले सल्ले व केलेले इंटेरियर हे आपल्या फायद्याचे ठरते.सध्या सुरू असलेला ट्रेंड व वापरायच्या आधुनिक वस्तू यांचे अपडेट असल्यामुळे हे इंटेरियरवाले आपल्याला उत्तम मार्गदर्शन करू शकतात. इंटेरियरबाबतीत नको तिथे पैसे वाचवण्याचा प्रकार करू नये. इंटेरियरच्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

वास्तविक इंटेरियर किंवा फर्निचर करताना आपल्या जागेचा विचार करून करणे गरजेचे आहे. अन्यथा, दहा बाय सातच्या छोट्याशा हॉलमध्ये भरमसाठ मोठा कोच किंवा बैठकीची व्यवस्था ही अडवणूक करणारी ठरू शकते. नेहमी इंटेरियर करताना थोडासा वास्तुशास्त्राचा आधार देखील घ्यावा. त्यानुसार फर्निचरचे रंग पडद्यांचे रंग भिंतींचे रंग निवडताना विशेष काळजी घ्यावी. वास्तूच्या मते, ऊर्जा आपल्या जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीवर परिणाम करते. म्हणूनच वास्तुशास्त्रात नेहमीच ऊर्जेला महत्त्व दिले जाते. घरात ठेवलेल्या वस्तू व आसपासच्या वातावरणामधूनही ऊर्जा प्रसारित केली जाते. म्हणून घरात फर्निचर ठेवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याकडे दिवाणखाना किंवा ड्रॉईंग रूममध्ये फर्निचर असे असायला हवे की हॉलमध्ये वावरताना अडचण पडता कामा नये. हॉलमध्ये जेवढा हवेशीरपणा असेल तेवढे उत्तम, तसेच हॉलमध्ये विनाकारण आरसेही नसावेत. हॉलमध्ये पूर्व किंवा पश्चिम भिंतीला एक फॅमिली फोटो जरूर लावावा त्यात मृत व्यक्ती मात्र नसावा. आपल्या घरासाठी फर्निचर करताना आपण जे लाकूड वापरणार ते शक्यतो सागवान किंवा शिसम असावे. वड पिंपळ किंवा औदुंबराचे फर्निचर मध्ये लाकूड वापरू नये. कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड सर्वोत्कृष्ट मानले जाते. तसेच बाभळीचे लाकूड अजिबात वापरू नये. घरात फर्निचर ठेवताना, आपण ते कोणत्या दिशेला ठेवतो याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

वास्तूशास्त्राने घराच्या उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने जड फर्निचर ठेवू नये असा स्पष्ट निर्देश दिला आहे. जर तुम्हाला वजनदार सामान किंवा फर्निचर ठेवायचे असेल तर ते दक्षिणेकडील बाजूला किंवा नैऋत्य बाजूला किंवा नैऋत्य पश्चिम बाजूला ठेवावे. टीव्ही युनिट शक्यतो पूर्व-पश्चिम असावे शक्यच नसेल तर उत्तर भिंतीला ही टीव्ही युनिट चालेल. हॉलमध्ये एखादे झाड जरूर असावे. ग्रीन पाम किंवा आरेका पााम छान वाटेल. शस्त्रानुसार घरात जेवणाचे टेबल कधीही गोल किंवा अंडाकृती किंवा षटकोनी असू नये. जेवणाचे टेबल चौरस असले पाहिजे हे नेहमी लक्षात असू द्यावे. आपण झोपतो त्या बेडच्या डोक्याच्या बाजूला जर एखादे डिझाइन बनवत असाल तर ते चांगले आणि शुभ असावे. तेेथे आरसेे नसावे तसेेेच बेडरूममध्ये रोमॅंटिक चित्रे, पती-पत्नींचा हसरा रोमँटिक फोटो जरूर लावा. हिंसक जनावराची आकृती जसे की सिंह, गरूड यासारख्या शिकारी प्राण्याचे आकृती किंवा चित्रेे लावू नयेत. झोपताना शक्यतो दक्षिणेला डोके होईल किंवा पूर्व-पश्चिम डोके होईल असे बेेेड करावेत. उत्तरेला डोके करून झोपू नये. आपल्या पलंगाचे किंवा बेडचे पाय किंवा काही भाग चंदनाचा बनवता आला तर पाहावा. शक्य नसेल तर चंदनाचे चार छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून आपल्या पलंगाखाली जरूर बसवावे. आपल्या बेडमध्ये वास्तू मंजूषा नावाची वस्तू जरूर ठेवावी. फर्निचर तयार करतानाा नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की फर्निचरच्या कडा तीक्ष्ण, टोकदार नसाव्यात, वास्तूच्या मते, गोलाकार काठासह फर्निचर नेहमीच चांगले असते. अन्यथा, बऱ्याचदा गुडघ्यांना किंवा नडग्यांना दुखापत होते. हल्ली लाईट सिस्टीम ही केली जाते. मंद लाइट्स फर्निचरच्या आतून सोडले जातात त्या शक्यतो वार्म कलरच्या असावा. पांढऱ्या शुभ्र शक्यतो टाळाव्यात. बेडरूममध्ये फर्निचर करताना बेडचे प्रतिबिंब आरशात पडणार नाही असा ड्रेसिंग टेबल करावा.

आपले घर जर छोटे असेल तर जास्तीत जास्त स्टोरेज करावे. परंतु स्टोरेज करत असताना घर गच्च फर्निचरने भरू नये. घराला loft असतील तर ते उघडे ठेवू नयेत बंदिस्त करावेत . मी बऱ्याच ठिकाणी बेडच्या वर अर्धगोलाकार पीओपी केलेले पाहिले आहे. तसे अजिबात नसावे. वुडन कलरचे सनमायक उत्तम राहतात किंवा वूडन फिनश उत्तम राहतात. मुलांच्या सेपरेट रूम असतील तर त्यांचे कलर थोडे कलरफुल असावेत. किचनच्या ट्रॉलीज करताना काळ्या रंगाच्या करू नये. तसेच कर्त्या स्त्रीच्या राशीनुसार शुभ वृक्षाच्या लाकडाचा तुकडा त्या फर्निचरमध्ये जरूर वापरावा . किमान पोळपाट किंवा एखादी लाकडी वस्तू कर्त्या स्त्रीच्या शुभ वृक्षांची असावी असा प्रयत्न करावा. जर तुम्ही स्टोअर रूम करत असाल तर त्याला काचा नसाव्यात.

पडदे आपल्या राशीनुसार टाकू शकता किंवा फेंटर कलरचे सुद्धा चालतात परंतु पांढरेशुभ्र पडदे खूप मेंटेनन्स काढतात. अर्थातच, आपल्याला जेव्हा फर्निचर करायची वेळ मिळेल तेव्हा चांगला इंटेरियरचा सल्ला घ्यावा व त्यांना विनंती करावी की हे फर्निचर वास्तुशास्त्राचा आधार घेऊन करावे. बऱ्याचदा बेडरूममध्ये फ्लोरिंग हे लाकडाचे केले जाते. अशा वेळेस हे फ्लोरिंग डार्क कलरचे नसावे. घराच्या दक्षिण बाजूस जड फर्निचर असावे. कोणत्याही खोलीच्या नैऋत्य कोपर्‍यात उत्तरेकडे तोंड करून पैशाचे कपाट असावे. घरात भरपूर देवी-देवतांची चित्रे नसावी. देवघरा व्यतिरिक्त देवांच्या मूर्ती शक्यतो शो म्हणून कोठेही ठेवू नयेत. हल्ली थ्रीडी स्वरूपामध्ये पोस्टर येतात. ती आपण लावू शकता परंतु त्यातून मनाला आनंद मिळावा अशी ती पोस्टर्स असावीत. दुःखदायी व निराशा वाढवेल अशी पोस्टर्स अजिबात लावू नयेत. मुख्य दरवाजावर आरसे अजिबात लावू नयेत तर मुख्य दरवाजा वरती गणपती बसवतो त्या पद्धतीने मूर्ती स्वरूपात गणपती बसवू नये. साधी गणपतीची टाइल्स लावावी त्याचबरो घराच्या दरवाजाला नेहमी रुद्राक्ष तोरण किंवा स्वस्तिक पिरामिड लावावे.

- आनंद पिंपळकर